पृष्ठे

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११


पारंपारिक इडली

  • साहित्य- तांदूळ-१ किलो, उडीद डाळ २५० ग्रॅम, उकडलेला भात-१ वाटी,मीठ चवीनुसार.
  • कृती-  प्रथम तांदूळ आणि उडीद डाळ नीट धुवून  घ्यावेत व कोमट पाण्यात २ तासांसाठी वेगवेगळे      भिजवावेत,त्यानंतर तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्यावेत,१वाटी उकडलेला भात ही वाटून घ्यावा,वाटलेले सर्व मिश्रण चांगले घोटून एकत्र करून घ्यावे.हे मिश्रण १० तास आंबविण्याकरिता ठेवावे,८ ते १० तासांनी पीठाचे मिश्रण चांगले आंबेल व पीठ थोडे फुलून येईल.त्यानंतर   इडलीचे पात्र घेऊन थोडे पाणी त्यात ओतावे व पात्र शेगडीवर मध्यम आचेवर ठेवावे,पाण्याला उकळी आल्यावर इडलीच्या साच्याला थोडे तेल लावून त्यात तयार मिश्रण घालावे, १५ ते २० मिनिटात इडली शिजते.साधारण ५ मिनिटांनी इडलीचे पत्र सावकाश उघडावे,तयार इडल्या पाण्याचा हात लावून अलगदपणे साच्यातून काढाव्यात,अशाप्रकारे तयार इडली खोबऱ्याच्या चटणी बरोबर द्यावी. 
  • टीप-  इडलीचे मिश्रण तयार करताना उकडलेला भात घालावा असे सांगण्याचे कारण असे कि आपल्या स्वयंपाकघरात इडली करताना उकडा तांदूळ जर नसेल तर आपला नेहमीचा साधा तांदूळ उकडलेल्या भातासोबत मिक्सरमध्ये वाटल्यास इडल्या अतिशय मऊ आणि शुभ्र होतात.
  • आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!